रिक्षाविषयीच्या तक्रारी पोस्टाने पाठवा
By Admin | Updated: September 18, 2014 02:22 IST2014-09-18T02:22:35+5:302014-09-18T02:22:35+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवल्या जात असतानाच आरटीओ अधिका:यांनी प्रवाशांना पोस्टाने तक्रारी पाठवण्याची अजब सूचना केली आहे.

रिक्षाविषयीच्या तक्रारी पोस्टाने पाठवा
डोंबिवली : एकीकडे जगभरात फेसबुक आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवल्या जात असतानाच आरटीओ अधिका:यांनी प्रवाशांना पोस्टाने तक्रारी पाठवण्याची अजब सूचना केली आहे. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारासंदर्भात एमआयडीसी येथे झालेल्या बैठकीत ही सूचना करण्यात आली. अशी सूचना करून आरटीओने ठोस कृतीला बगल दिल्याची नाराजी प्रवासी व्यक्त करत आहेत.
प्रवाशांच्या तक्रारी आणि त्यांना भेडसावणा:या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने मंगळवारी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात ‘डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन’ने या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रवाशांनी प्रशासनासमोर अनेक तक्रारींचा पाढा प्रवाशांनी वाचला. रिक्षाचालकांना पोलिसांचा धाक राहिलेला नसून ते केवळ महसूल गोळा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला. बेकायदा रिक्षा स्टॅण्डचे वाढलेले स्तोम पाहता ठाण्याच्या धर्तीवर नियोजन करा आणि बाजीप्रभू चौकात रिक्षांची स्वतंत्र रांग सुरू करा, अशा मागण्याही रहिवाशांनी वाहतूक पोलीस तसेच आरटीओकडे केल्या.
यावर बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू असल्याचा दावा वाहतूक निरीक्षक कदम यांनी केला, तर तक्रारींनुसार कारवाई करण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकारी सरक यांनी सांगितल़े शहराची लोकसंख्या वाढली, त्या प्रमाणात रिक्षा वाढल्या नाहीत. त्यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळेस रिक्षा मिळत नाहीत. वाहतूककोंडीमुळेही रिक्षा वेळेवर मिळत नाहीत, असे मत या वेळी रिक्षा युनियनचे अध्यक्ष मांजरेकर यांनी व्यक्त केले.
या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, मनसे शहराध्यक्ष आणि परिवहनचे माजी सभापती राजेश कदम यांच्यासह आरटीओचे अधिकारी राजेश सरक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कदम, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत नरवणो, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना युनियनचे अध्यक्ष संजय मांजरेकर यांच्यासह ‘वेल्फेअर असोसिएशन’चे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
च्रिक्षाचालकांना पोलिसांचा धाक राहिलेला नसून ते केवळ महसूल गोळा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला.
च्भाडे नाकारणो, उद्धट वर्तन, मीटरप्रमाणो भाडे घेण्यास नकार देणो, शेअर पद्धतीत चौथा प्रवासी बेकायदा घेणो.. अशा तक्रारींचा पाढा प्रवाशांनी वाचला.