बनावट सातबारा बनविणारा ताब्यात
By Admin | Updated: March 10, 2015 22:25 IST2015-03-10T22:25:30+5:302015-03-10T22:25:30+5:30
बनावट सातबारा व आठ ‘अ’चे उतारे तयार करीत त्यावर सही व शिक्के मारून ते बँकेत दिल्याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

बनावट सातबारा बनविणारा ताब्यात
नागोठणे : बनावट सातबारा व आठ ‘अ’चे उतारे तयार करीत त्यावर सही व शिक्के मारून ते बँकेत दिल्याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सहाय्यक पो. निरीक्षक संजय मोगले आणि त्यांच्या पथकाने तपासाअंती यातील एक आरोपी वसंत रामचंद्र पाटील (रा. गांधे) याला ताब्यात घेतले असून इतर पंधरा आरोपी पसार झाले आहेत, तरी त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
किसान क्र ेडिट कार्ड योजनेंतर्गत कर्ज उचलण्यासाठी विभागातील बेणसे येथील बँक आॅफ इंडिया शाखेत पेण तालुक्यातील गांधे, चोळे व परिसरातील वीस जणांनी तलाठी सजा, शिहू कार्यालयाचे सात बारा तसेच आठ अचे उतारे दिले होते. हे दाखले पडताळणीसाठी बँकेकडून शिहू तलाठी सजाकडे पाठविण्यात आले होते. तलाठी तानाजी शिंदे यांना यापैकी सोळा जणांच्या उताऱ्यांची नोंद त्यांच्या अभिलेखातच नसल्याचे आढळून आले.
बनावट कागदपत्रे तयार करून बँक आणि शासनाची फसवणूक केली हा ठपका ठेवत शिंदे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता, त्यानुसार वसंत पाटील याला ताब्यात घेऊन पेण न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)