ऑनलाइन वर्ग सुरू असताना लागला पॉर्न व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:06 IST2021-06-28T04:06:38+5:302021-06-28T04:06:38+5:30

गुन्हा दाखल, विलेपार्लेतील घटना ऑनलाइन वर्ग सुरू असताना लागला पॉर्न व्हिडिओ गुन्हा दाखल, विलेपार्लेतील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

Porn video started while the online class started | ऑनलाइन वर्ग सुरू असताना लागला पॉर्न व्हिडिओ

ऑनलाइन वर्ग सुरू असताना लागला पॉर्न व्हिडिओ

गुन्हा दाखल, विलेपार्लेतील घटना

ऑनलाइन वर्ग सुरू असताना लागला पॉर्न व्हिडिओ

गुन्हा दाखल, विलेपार्लेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयातील ऑनलाइन वर्ग सुरू असताना पॉर्न व्हिडिओ लागल्याने खळबळ उडाली. हॅकर्सने यंत्रणा हॅक करून पॉर्न व्हिडिओ लावल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

ऑनलाइन वर्ग सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ लागला. शिक्षकांनी तात्काळ ताे बंद केला. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, महाविद्यालयीन प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली.

गेल्या काही दिवसांपासून सायबर बुलिंगसाठी काही जण ऑनलाइन अश्‍लील कृत्य करणे, अश्‍लील संभाषण करणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे, असे प्रकार करत आहेत. केवळ मौजमजेसाठी असे प्रकार घडत असल्याचे काही प्रकरणांतून उघडकीस आले आहे. याबाबत सायबर विभाग अधिक तपास करत आहे.

..............................................

Web Title: Porn video started while the online class started