पोलीस शिपायाचे तरुणीशी अश्लील वर्तन

By Admin | Updated: July 16, 2015 04:52 IST2015-07-16T04:52:37+5:302015-07-16T04:52:37+5:30

एका तरुणीला धक्काबुक्की करीत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी प्रसाद दळवी (२८) या पोलीस शिपायाला कस्तूरबा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. डी. एन. नगर

Poor sexual behavior | पोलीस शिपायाचे तरुणीशी अश्लील वर्तन

पोलीस शिपायाचे तरुणीशी अश्लील वर्तन

मुंबई : एका तरुणीला धक्काबुक्की करीत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी प्रसाद दळवी (२८) या पोलीस शिपायाला कस्तूरबा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. डी. एन. नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हा शिपाई मंगळवारी मुलाच्या आजारपणाचे कारण सांगून पोलीस ठाण्यातून लवकर निघाला होता. त्यानंतर त्याने हा प्रकार केल्याचे पोलीससूत्रांचे म्हणणे आहे.
मंगळवारी सायंकाळी नॅशनल पार्कमध्ये मित्रासोबत आलेल्या एका २२ वर्षीय तरुणीची विनाकारण चौकशी करीत नंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा दळवीवर आरोप आहे. दहिसर परिसरात तो राहतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलाची प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगत दळवी पोलीस ठाण्यातून घरी लवकर गेला. मात्र तो घरी न जाता नॅशनल पार्कमध्ये का गेला, याचेच आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. दळवीचे पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड मात्र अत्यंत ‘क्लीन’ आहे. त्यामुळे आता पार्कमध्ये कोणत्या उद्देशाने गेला होता याची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत.

Web Title: Poor sexual behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.