Pools increased by 80 thousand million liters of water storage | तलावांमध्ये वाढला आणखी ८० हजार दशलक्ष लीटर जलसाठा

तलावांमध्ये वाढला आणखी ८० हजार दशलक्ष लीटर जलसाठा

मुंबई :मुसळधार पाऊस तलाव क्षेत्रात मुक्कामी असल्याने पाण्याची पातळी झटपट वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तलावांमधील जलसाठा आणखी ८० दशलक्ष लीटरने वाढला आहे. गतवर्षीच्या जलसाठ्याच्या तुलनेत आजचा जलसाठा केवळ अडीच टक्के कमी आहे. त्यामुळे पाण्याचे टेन्शन आता निवळले आहे.


तलावांमध्ये २८ जून रोजी केवळ चार टक्के जलसाठा शिल्लक होता. यामुळे मुंबईत पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे होती. अप्पर वैतरणा आणि भातसा या शासकीय तलावांतील राखीव जलसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती. त्यात वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर धरला. तेव्हापासून तलाव क्षेत्रात सतत पाऊस कोसळत आहे.


दररोज चार ते पाच टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ होत आहे. गुरुवार सकाळपर्यंत तलावांमध्ये एकूण पाच लाख ४७ हजार जलसाठा जमा झाला होता. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये पाच लाख ८० हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता. तर २०१७ मध्ये सहा लाख ९५ हजार दशलक्ष जलसाठा होता. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज आहे.


११ जुलै २०१९
तलाव शिल्लक २४ तासांतील
जलसाठा पाऊस (मि.मी.)

अप्पर वैतरणा ० १७५
मोडक सागर ९३०५१ १२६
तानसा ८९०२३ १०१
मध्य वैतरणा १०१९७२ १५९
भातसा १९६१३९ १७९
विहार १४४७९ २५
तुळशी ७३९१ ८७

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान आजची स्थिती

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १५८.७१
तानसा १२८.६३ ११८.८७ १२५.५०
विहार ८०.१२ ७३.९२ ७७.६०
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.०१
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ५९३.०३
भातसा १४२.०७ १०४.९० १२१.००
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २६८.३०

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pools increased by 80 thousand million liters of water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.