खड्डय़ांत गेला पूल

By Admin | Updated: August 8, 2014 00:19 IST2014-08-08T00:19:31+5:302014-08-08T00:19:31+5:30

जागतिक कीर्तीच्या जेएनपीटी बंदराच्या दळणवळणातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या करळ पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

The pool went to the potholes | खड्डय़ांत गेला पूल

खड्डय़ांत गेला पूल

>चिरनेर : जागतिक कीर्तीच्या जेएनपीटी बंदराच्या दळणवळणातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या करळ पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यासंदर्भात जेएनपीटी बंदरातील या सर्व विभागांची जबाबदारी असलेले अधिकारी लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुलावर खड्डे पडल्याचे वृत्त मान्य केले. या पुलाच्या दुरूस्तीचे काम ज्या कंत्रटदाराकडे आहे, त्यांच्याकडून आम्ही दुरूस्तीच्या कामाबाबत वॉरंटी घेतलेली असल्याने त्यांनी हे खड्डे बुजविण्याची प्रक्रिया  सुरू केली आहे. मात्र हा पूलच जेएनपीटीच्या स्थापनेच्या वेळी अत्यंत तुरळक वाहतुकीसाठी उभारण्यात आला होता.  मात्र आता त्याच्यावरून सुमारे 4क् टनाचे कंटेनर ट्रेलर धावतात. त्यामुळे हा पूलच खिळखिळा झाला आहे. त्यामुळे कितीही वेळा दुरुस्ती केली तरी त्यातून हे प्रसंग निर्माण होणारच, असेही लोखंडे सांगितले. 
उरणमधील जेएनपीटी बंदर म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे असेच असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर येत आहे. मात्र प्रशासन भौतिक सेवा-सुविधांबाबत फारसे गंभीर नसल्याने गेल्या काही वर्षात बंदरातील बराचसा व्यवसाय गुजरातकडे वळत आहे. या सुविधांपैकी दळणवळणाच्या अतिशय महत्त्वाच्या सुविधेकडे बंदराच्या प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. बंदराचा व्यवसाय उभारणीच्या वेळेच्या अनुषंगाने सुमारे 2क्क् ते 3क्क् टक्क्यांनी वाढला असताना स्थानिकांसाठी साधे सव्र्हिस रस्तेही तयार करण्यात आलेले नाहीत. 25 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला करळचा रेल्वेपूल हा केवळ 2क् टनांच्या कंटेनर ट्रेलरच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आला होता. आता त्याच पुलावरून 4क् टनांचे कंटेनर ट्रेलर चालत असल्याने हा पूलच खिळखिळा बनला आहे. त्यातच अवघ्या 19 कोटी रूपयांना बांधण्यात आलेल्या या पुलाच्या दुरूस्तीवर जेएनपीटीने आतार्पयत 55 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यावरही या पुलावरचे खड्डे जैसे थे असल्याचा अनुभव या रस्त्याने प्रवास करणा:या प्रवाशांना येत आहे.
जेएनपीटी बंदरात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने कामाचा दर्जा सुधारण्याची तसेच सिमेंट काँक्रीटीकरणाची गरज आहे. मात्र त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तर अधिकारी लोखंडे यांनी पुलाच्या दुरूस्तीच्या कामाबाबत वॉरंटी घेतलेली असल्याचे हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
(वार्ताहर) 

Web Title: The pool went to the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.