पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:16 AM2020-08-09T04:16:09+5:302020-08-09T04:16:13+5:30

संकेतस्थळावर वेळापत्रक जारी; २४२ सुविधा केंद्रांची निवड

Polytechnic admission process starts from tomorrow | पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

Next

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ आॅगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी पदविका आणि औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमामधील प्रथम वर्ष पोस्ट एचएससी अभियांत्रिकी पदवी प्रवेशप्रक्रिया यामध्ये राबविली जाणार आहे.

या प्रवेशप्रक्रियेत अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमांत काही बदल तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रस्तावित केले होते. राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेशनिश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वत: आॅनलाइन माध्यमातून करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई स्क्रुटिनी पद्धतीची माहिती इत्यादी सविस्तर माहिती ँ३३स्र://६६६.३िीेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असे असेल वेळापत्रक
१० ते २५ ऑगस्ट - ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड
करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे.
११ ते २५ ऑगस्ट - कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे.
२८ ऑगस्ट - तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
२९ ते ३१ ऑगस्ट - तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास, तक्रार करणे.
२ सप्टेंबर - अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.

पदविका अभ्यासक्रम व मागील वर्षीच्या जागा
पदविका अभ्यासक्रम शासकीय अशासकीय एकूण
अनुदानित वि अनुदानित
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी १७ ७५१ ३८९० ८६३९२ १०८०४१
द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी ७१०५ -- -- ८२२५७
औषधनिर्माणशास्त्र २१० ११५० २२९०१ २४२६१
हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नोलॉजी १२० ० ६० १८०
सरफेज कोटिंग टेक्नोलॉजी -- ४० ० ४०

Web Title: Polytechnic admission process starts from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.