Join us  

प्रदूषणामुळे कोरोनासह ग्लोबल वॉर्मिंगचेही चटके, अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 4:09 AM

लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते.

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश ठिकाणांवरील प्रदूषण कमी झाले होते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा प्रदूषणात भर पडली आहे. परिणामी, कोरोनासह ग्लोबल वॉर्मिंगचे चटके बसणार आहेत.लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच जून महिन्यात हे प्रमाण ४ टक्क्यांवर आले. मुंबईतही कमी झालेले प्रदूषण पुन्हा एकदा वाढले आहे. असे असले तरी मान्सूनमुळे मात्र सध्या मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. जगासह देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जनात घट झाली होती. मात्र अनलॉक सुरू होताच आता काही कालावधीनंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’झाली आहे. १० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राकडून ‘युनायटेड इन सायन्स’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील निष्कर्षानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होत आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा हिमनग, महासागर, निसर्ग, अर्थव्यवस्था आणि मनुष्यावर परिणाम होत आहे. उष्णतेच्या लाटेत वाढ होणे, जंगलांना आग लागणे, दुष्काळ पडणे आणि पूर येणे अशा घटनाही वाढल्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला थोपविण्यासाठी आणि तापमानवाढ १.५ डिग्रीखाली आणण्यासाठी आपल्या हातात आता पुरेसा वेळही शिल्लक राहिलेला नाही. यासाठी आपल्याला विज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. निर्णायक पाऊल उचलले पाहिजे, असे अहवाल म्हणतो....तर प्रदूषण नियंत्रण शक्यप्रदूषण वाढीस जबाबदार बांधकाम, वाहतूक, दळणवळण व उद्योगधंदे यावर नियंत्रण ठेवल्यास प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवणे शक्य होईल. अनलॉकमुळे दळणवळण सुरू झाल्याने प्रदूषण नियंत्रणात अडचणी येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वाहनांचा धूर वाढला- मुंबईच्या हवा प्रदूषणाच्या पातळीत १७ मार्चपासूनच घट झाली.- १७ ते २२ मार्च या कालावधीत वांद्रे व कुर्ला या परिसरात हवा प्रदूषणात मोठी घट झाली. वांद्रे परिसरात नायट्रोजन डायआॅक्साइडच्या प्रमाणात ८१% तर कुर्ला परिसरात ९२% घट झाली.- एप्रिलपर्यंत प्रदूषणात घट होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने वाहनांचा धूर वाढला, प्रदूषणास कारणीभूत ठरणारी अन्य कामे सुरू झाली आणि ‘पुनश्च हरिओम’ म्हणत प्रदूषणही हळूहळू वाढू लागले.

टॅग्स :मुंबईप्रदूषण