तळोजा, कळंबोलीत शांततेत मतदान; कुठेही अनुचित प्रकार नाही

By Admin | Updated: October 15, 2014 22:47 IST2014-10-15T22:43:59+5:302014-10-15T22:47:59+5:30

पनवेल विधानसभेचे मतदान बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या

Polling in peaceful, Taloja, Kalamboli; There is no inappropriate type anywhere | तळोजा, कळंबोलीत शांततेत मतदान; कुठेही अनुचित प्रकार नाही

तळोजा, कळंबोलीत शांततेत मतदान; कुठेही अनुचित प्रकार नाही

तळोजा : पनवेल विधानसभेचे मतदान बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. प्रसार माध्यमातून मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्यास आवाहन केल्यानंतर मतदार जागरुकतेने बाहेर पडल्याचे दिसत होते. कळंबोली, तळोजा परिसरातील निवडणुकीच्या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी पोलिसांबरोबरच सीआयएसएफ जवान सुद्धा तैनात होते. तळोजातील नावडे, पाचनंद, तळोजा मजकूर या परिसरात मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत आपला अधिकार बजावला. (वार्ताहर)

Web Title: Polling in peaceful, Taloja, Kalamboli; There is no inappropriate type anywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.