पेणमध्ये ६८ टक्के मतदान शांततेत

By Admin | Updated: October 15, 2014 22:47 IST2014-10-15T22:46:59+5:302014-10-15T22:47:31+5:30

प्रत्यक्ष मतदानात दोन तासांची वेळ वाढविल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८ ते ७० टक्के भरघोस मतदानाची अपेक्षा वर्तवली जात आहे

Polling in 68 percent polling | पेणमध्ये ६८ टक्के मतदान शांततेत

पेणमध्ये ६८ टक्के मतदान शांततेत

पेण : ‘चला मतदानाला’या निवडणूक आयोगाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत १९१ पेण-पाली-सुधागड-नागोठणे विधानसभा मतदारसंघात मतदारांनी आपले कर्तव्याचे पालन करण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळी ७.०० पासून चांगलीच गर्दी केली. दुपारी १.०० वाजेपर्यंत ३२ टक्के तर दुपारी ३.०० वाजेपर्यंत मतदारांचा टक्का १५ टक्क्यांनी वाढून टक्केवारी ४७.८९ टक्क्यावर जावून पोहोचली. प्रत्यक्ष मतदानात दोन तासांची वेळ वाढविल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८ ते ७० टक्के भरघोस मतदानाची अपेक्षा वर्तवली जात आहे.
पेण- पाली - सुधागड मतदारसंघात प्रमुख पाच राजकीय पक्ष स्वबळावर एकमेकांसमोर उभे ठाकल्याने एकंदर निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता गाव, वाडी, शहरातील प्रभाग, वार्डमधून मतदारांना मतदान केंद्राकडे जाण्यासाठी धावपळ करीत होता. (वार्ताहर)

Web Title: Polling in 68 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.