दोन म्हशींना शोधण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:24 IST2020-12-16T04:24:18+5:302020-12-16T04:24:18+5:30
- आरेच्या तबेल्यातील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगावमधील आरेच्या तबेल्यातून दोन म्हशींची चोरी करण्यात आली आहे. त्या ...

दोन म्हशींना शोधण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव!
- आरेच्या तबेल्यातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावमधील आरेच्या तबेल्यातून दोन म्हशींची चोरी करण्यात आली आहे. त्या शोधण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची माहिती आहे.
आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी १ डिसेंबर, २०२०च्या रोजी चोरीला गेल्याची तक्रार आरे पोलिसांना मिळाली आहे. त्यांची एकूण किंमत ३ लाखांच्या आसपास आहे. रात्री १२ ते ३च्या दरम्यान या म्हशी पळविण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आरे परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले असून दोन म्हशींबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या म्हशींना शोधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. मात्र हा मंत्री कोण आहे याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे कोरोना काळात नववर्षाच्या आगमनाच्या कार्याला गालबोट लागू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांच्या डोक्याला हा नस्ता ताप होऊन बसला आहे.