बचतगटांवर ‘राजकीय’ लक्ष
By Admin | Updated: September 19, 2014 01:20 IST2014-09-19T01:20:39+5:302014-09-19T01:20:39+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये महिला बचतगट व संस्था, संघटनांचे महत्त्व वाढले आहे.

बचतगटांवर ‘राजकीय’ लक्ष
नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये महिला बचतगट व संस्था, संघटनांचे महत्त्व वाढले आहे. शहरात तब्बल 55क्क् बचत गट असून 1 लाख 1क् हजार महिलांचा यामध्ये सहभाग आहे. राजकीय पक्षांनी या सर्वावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबईमधील दोन्ही मतदार संघामध्ये यावर्षी चुरशीची लढत होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षात बचत गटांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना विभागाच्या माध्यमातून महिला
बचत गटांना मदत केली जाते. सद्यस्थितीमध्ये पालिकेमध्ये तब्बल साडेपाच हजार बचत गटांची नोंद झाली आहे. यामध्ये जवळपास 1 लाख 1क् हजार महिला सभासद आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात महिला संघटित असल्यामुळे त्यांच्या मताकडे सर्वच पक्ष लक्ष देवू
लागले आहेत. बचत गटांना विविध आमिषेही दाखविली जात आहेत. काही बचत गट राजकीय पदाधिकारीच चालवत आहेत. निवडणुकीमध्ये प्रचारासाठीही या सभासदांची मोठी मदत होत असते. यावेळीही बचत गटांची मते मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली असून ही मते कोणाच्या पारडय़ात जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
नवी मुंबईमध्ये देशाच्या कानाकोप:यातील नागरिक वास्तव्यास आहेत. प्रत्येक प्रांत, समाज, जात, भाषानिहाय शेकडो संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक विभागामध्ये युवकांच्याही मोठय़ा संघटना आहेत. गणोश उत्सव, शिवजयंती व इतर उत्सव मंडळेही कार्यरत आहेत. प्रत्येक मंडळांमध्ये 1क्क् ते काही हजारांवर सभासद आहेत. या संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही संस्था व मंडळांनी स्वत:हून पाठिंबा देण्यास सुरुवात केली
आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये संस्थांच्या पदाधिका:यांचा राबता वाढला असल्याचे दिसत आहे. निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये सातारा, जावली, कराड, आंबेगाव, खेड, जुन्नर व इतर तालुक्यातील रहिवासी मंडळांचे मेळावे झाले असून संबंधित विभागातील नागरिकांना निवडणुकीत पाठिंब्याचे आवाहन करण्यात आले आहे.
च्विविध संस्था व संघटनांना राजकीय पक्षांकडून नियमित मदत केली जाते. ज्यांना यापूर्वी मदत केली आहे त्यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.
च्ज्यांना मदत केलेली नाही त्यांना विविध कामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. सर्वच पक्षांनी लक्ष दिल्यामुळे संस्था, संघटनांच्या पदाधिका:यांना विशेष महत्त्व प्राप्त
झाले आहे.
व्हॉट्सअॅपवरही विविध पक्षांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. नवी मुंबईसह राज्यातील इतर मतदार संघातील उमेदवार व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत असून निवडणुकीमध्ये मदत करण्याची मागणी
केली जात आहे.