राजकीय वातावरण तापणार!

By Admin | Updated: March 29, 2015 22:30 IST2015-03-29T22:30:57+5:302015-03-29T22:30:57+5:30

रायगड जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २४ एप्रिलला मतदान होणार आहे.

Political atmosphere prevail! | राजकीय वातावरण तापणार!

राजकीय वातावरण तापणार!

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २४ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विधानसभांच्या निवडणुकांनंतर पुन्हा राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल. अलिबाग, रोहे, पनवेल, कर्जत, माणगाव, खालापूर, आणि मुरुड अशा सात तालुक्यांत निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापणार आहे.
जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी, मानतर्फे झिराड, सासवणे आणि वाघोडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रोहे तालुक्यातील रोठे खुर्द, रोठे बुद्रुक, निडीतर्फे अष्टमी, माणगाव - माणगाव, बामणोली, देवळी, लोणेरे, लाखपाले, टेमपाले, पनवेल- नानोशी, वडघर, उलेवे, कोळखे, मोर्बे, वाकडी, रोहिंजण, बारवाई, खान्नावळे, साई, पोसरी, सांगुर्ली, वाजे, सावळे, कर्जत-पोशिर, पोटल, हुमगाव, कोल्हारे, जिते, साळोखतर्फे वरेडी अशा ३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
पनवेल तालुक्यातील देवळोली, खालापूर तालुक्यातील वरोसे, बोरगाव, चावणी, नडोदे, मुरुड- राजपुरी, नांदगाव, सावली, नडगाव, तळा- मांदाड, गिरणे, भानंग, रहाटाड, महागाव कर्जत-पाषाणे, उमरोली या १६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ४ ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १० एप्रिलला अर्जांची छाननी होणार असून १३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
२४ एप्रिलला सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political atmosphere prevail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.