मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST2021-06-30T04:06:10+5:302021-06-30T04:06:10+5:30
मुंबई : देशातील एकही मूल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणांकडून विशेष प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना ...

मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण
मुंबई : देशातील एकही मूल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय यंत्रणांकडून विशेष प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानेही पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, रविवारी (दि.२७) मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण मोहीम पार पडली.
मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने मुंबई विमानतळावर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत १५२ मुलांना पोलिओ लस देण्यात आली. त्यात पाच वर्षांखालील ८० मुलांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर नियमांचे भान राखत काउंटरची संख्या वाढविण्यात आली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
२०१० पासून मुंबई विमानतळावर पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास ९३०० मुलांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात पाच वर्षांवरील मुलांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे, अशीही माहिती देण्यात आली.
......