७० हजार बालकांना देणार पोलिओ डोस
By Admin | Updated: January 16, 2015 23:05 IST2015-01-16T23:05:19+5:302015-01-16T23:05:19+5:30
येथील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांतील ७० हजाराहून अधिक बालकांना रविवारी १८ जानेवारीला पोलिओचे डोस देण्यात येणार

७० हजार बालकांना देणार पोलिओ डोस
जव्हार : येथील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांतील ७० हजाराहून अधिक बालकांना रविवारी १८ जानेवारीला पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणा ेअंतर्गत होणाऱ्या या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठीची लसी, वाहन, थर्माकोल पेटी, आदी साहित्य आले असल्याची माहिती डॉ. आर. पी. पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
जव्हार तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व कुटीर रूग्णालये यांचा समावेश होतो, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत, जामसर, नांदगाव व साकूर तसेच कुटीर रूग्णालयांच्या कक्षेत १ लाख ५० हजार ५१८ लोकसंख्या असून ० ते ५ वर्षाचे लाभार्थी १८हजार ७६६ आहेत. त्यांना पोलिओ डोस देण्यासाठी २१४ बुथ, ५ मोबाईल टीम, ४ ट्रांझिट टीम असे एकुण २२३ बूथ निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विक्रमगड तालुक्यातून प्रा. आ. केंद्र मलवाडा, तलवाडा, कुर्झे मिळून लोकसंख्या १ लाख ५५ हजार ३९० असून पाच वर्षाच्या आतील बालके १९ हजार ६०६ आहेत. त्यांच्याकरीता १९७ बूथ, १२ मोबाईल टीम, व ८ ट्रांझिट टीम असे एकूण २१७ बूथ निर्माण करण्यात आलेले आहेत.
मोखाडा तालुक्यातून ४ प्रा.आ. केंद्र आसे, वाशाळा, मोऱ्हांडा व खोडाळा, मिळून ८८२७१ लोकसंख्येत ५ वर्षा आतील मुले ११ हजार ६५ असुन त्यांच्याकरीता १४२ बूथ, १ मोबाईल टीम, २ ट्रांझिट टीम, मिळून १४५ बूथ तर वाडा तालुक्यातुन ४ प्रा. आ. केंद्र परळी, गोऱ्हे, खानिवली व कुडूस मिळून लोकसंख्या १ लाख ८० हजार ९९९ असुन पाच वर्षा आतील बालके २० हजार ९५३ आहेत. त्यांच्या करीता २५९ बूथ , ५ मोबाईल टीम, ८ ट्रांझिट टीम असे मिळून २७६ बूथ तयार करण्यात आलेले आहेत.