पोलिसांचे पगार रखडले

By Admin | Updated: September 21, 2015 02:26 IST2015-09-21T02:26:09+5:302015-09-21T02:26:09+5:30

मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या २ हजार पोलिसांना सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी त्यांचा हाती आॅगस्ट महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही

Police's salary stops | पोलिसांचे पगार रखडले

पोलिसांचे पगार रखडले

मनीषा म्हात्रे, मुंबई
मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या २ हजार पोलिसांना सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी त्यांचा हाती आॅगस्ट महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मुंबईमध्ये अधिकारी आणि अंमलदार असे ४५ हजार पोलीस कार्यरत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांची २ वर्षांनी तर अंमलदारांची दर
५ वर्षांनी बदली होते. मुंबईत पाच प्रादेशिक विभाग आहेत. त्यात बदली झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी अथवा अंमलदार यांच्या सेवेची कागदपत्रे एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठविणे गरजेचे असते. जेणेकरून नियुक्त केलेल्या ठिकाणाहून त्यांना वेतन मिळेल. मात्र प्रशासकीय कामकाजाची कारणे पुढे केल्यामुळे पोलिसांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: Police's salary stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.