ज्येष्ठांना मिळणार पोलिसांचा आधार!
By Admin | Updated: July 25, 2014 23:59 IST2014-07-25T23:59:23+5:302014-07-25T23:59:23+5:30
पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांनी उचलली आहे.

ज्येष्ठांना मिळणार पोलिसांचा आधार!
पनवेल : पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांनी उचलली आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. लवकरच सर्वाना ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली.
अनेक ज्येष्ठ नागरिक घरात एकटेच राहतात. काहींची मुले नोकरी व्यवसानिमित्त बाहेर असल्याने घरात फक्त वृध्द आई -वडील राहतात. याचा फायदा उचलून त्यांना लुटण्याचे प्रकार घडतात त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी काही वृध्द व्यक्तींचे खूनही झाले आहेत. पनवेल शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ब:यापैकी असून ते घरात एकटेच राहतात. अनेकदा सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बतावणी करून लुटण्याचे प्रकारही घडतात. वयोवृध्द मंडळीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. परिणामी त्यांना एकाकी जीवन जगावे लागते. याचा विचार करून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याकरिता त्यांनी नुकतीच खास बैठक बोलवली होती. भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांबाबत एक सव्र्हे केला आहे. त्यांना शहरात सुमारे 5क्क् ज्येष्ठ आढळले आहेत. या सर्वाची माहिती घेण्यात आली असून त्यांचा रक्तगट कोणता, जवळच्या नातेवाईकांची नावे, वय, आजार, राहण्याचा पत्ता यासारखी माहिती घेण्यात आली आहे.
बीट अधिकारी ज्येष्ठ नागरिकांच्या दारी
पनवेल पोलीस ठाणोअंर्तगत येणा:या परिसराचे विभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाची जबाबदारी प्रत्येक अधिका:यांवर देण्यात आली असून त्यांना बीट अधिकारी म्हणून ओळखले जाते. सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचे हे बीट अधिकारी विभागातील ज्येष्ठ नागरिकांची घरी जावून त्यांची विचारपूस आणि चौकशी करतील.
ज्येष्ठ नागरिकांना एकटे गाठून खुनाचा किंवा सोनसाखळी चोरीचे प्रकार घडू नये या उद्देशाने लवकरच ओळखपत्र देण्यात येणार आहे.पोलीस आयुक्त के.ए.प्रसाद, उपायुक्त संजयसिंह येणपुरे यांच्यासह वरिष्ठ अधिका:यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.
वैद्यकीय सुविधाही देणार !
वृध्दापकाळामुळे जेष्ठ अनेक व्याधींनी त्रस्त असतात. आरोग्याची तक्रारी सुरूच असतात. काही जेष्ठाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी अनेक अडचणी येतात. शासकिय रूग्णालयात सुविधांचा वाणवा असल्याने खाजगी रूग्णालयाचा सहारा घ्यावा लागतो. या गोष्टींचा विचार करून त्यांना खाजगी वैद्यकीय सुविधा देण्यासंदर्भात आम्ही विचाराधीन असल्याचे भोसले यांनी सांगितले.