Join us

रेल्वे प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या ‘त्या’ देवदूतांचा व्हीजेटीआयकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:34 IST

रेल्वे प्रवासामध्ये अपघात होताना प्रवाशांचे प्राण वाचविणाºया देवदूतांचा सोमवारी माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये गौरव करण्यात आला.

मुंबई : रेल्वे प्रवासामध्ये अपघात होताना प्रवाशांचे प्राण वाचविणाºया देवदूतांचा सोमवारी माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये गौरव करण्यात आला. या कार्र्यक्रमात २९ देवदूतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस, तिकीट तपासनीस, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि प्रवासी यांचा सहभाग होता. या देवदूतांनी मृत्यूच्या दाढेतून अनेक प्रवाशांची सुटका केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव एका अ‍ॅपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.चार महिन्यांची गर्भवती असलेली महिला वांद्रे स्थानकावर पडली असता; तिला वाचविण्यासाठी महिला प्रवासी प्रेरणा शाह आणि रेल्वे पोलीस रूपाली मेजारी यांनी धाव घेतली. त्यामुळे तिचे प्राण वाचले. एक मुलगी लोकल जलद सुरू असताना दरवाजाच्या कडेला उभी राहिली होती.तिचा तोल जाऊन खाली पडणार; इतक्यात शेजारी उभ्या असलेल्या इस्तकार अहमद या प्रवाशाने तिला सावरले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घाटकोपर - विक्रोळी दरम्यान रेल्वे असताना तिला मदतीचा हात अहमद यांनी दिला. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला.अशा प्रकारे प्रवाशांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणाºया मुकेश यादव, वीरेंद्र यादव, एस. टी. बिराजदार, संदीप कुमार यादव, उत्तम कुमार गौतम, सुनील कुमार नापा, घनश्याम शिंदे, सोनाली पवार, बलविंदर, दयाराम, अमित पहाल, मोनू मेहरा, सचिन पोळ, विनोद शिंदे, राज कमल, अरुण कुमार, जे. पी. एस. यादव, जावेद शेख, विनीत कुमार, अशोक कुमार यादव, उदय मसुरकर, रमेशचंद्र चौधरी, विनीत सिंग, महादेव पावने या रेल्वे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला.पॉइंटमन गणेश वाडके, मोटरमन चंद्रशेखर सावंत, तिकीट तपासनीस श्रीकांत चव्हाण, प्रवासी श्रावण प्रेम तिवारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे संतोष पाटील, शोएब शेख या देवदूतांना पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. आरपीएफचे उप मुख्य महानिरीक्षक भावप्रीता सोनी, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आर. पी. बरपग्गा, आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.़़़तर कोणाचा जीव जाणार नाहीकार्यक्रमाचे आयोजक एम इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके या कार्यक्रमाबद्दल म्हणाले की, प्रवासात लहान-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो. मात्र असे देवदूत प्रवासात असल्यास कोणाचा जीव जाऊ शकत नाही.देवदूतांनी मृत्यूच्या दाढेतून अनेक प्रवाशांची सुटका केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला.

टॅग्स :भारतीय रेल्वे