घरातून पळालेल्या चंद्रपूरमधील मुलीस पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:08 AM2019-07-14T02:08:50+5:302019-07-14T02:08:53+5:30

पालकांशी वाद करून मुलगीने रागाच्या भरात चंद्रपूर येथील राहते घर सोडून मुंबईतील मायानगरीत आली.

Police took the girl from Chandrapur and handed over to the parents | घरातून पळालेल्या चंद्रपूरमधील मुलीस पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

घरातून पळालेल्या चंद्रपूरमधील मुलीस पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन

Next

मुंबई : पालकांशी वाद करून मुलगीने रागाच्या भरात चंद्रपूर येथील राहते घर सोडून मुंबईतील मायानगरीत आली. सीएसएमटी स्थानकावर एकटीच फिरत असताना पोलिसांनी आढळून आली. तेव्हा पोलिसांनी मुलीची समजूत काढून पालकाकडे सुपूर्द केले.
सीएसएमटी स्थानकावर ११ जुलै रोजी एक १६ वर्षीय सुजाता सिंह (नावात बदल केला आहे)भटकत असताना गस्तीवरील पोलिसांना दिसली. या मुलीला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस करण्यात आली. तेव्हा तिने रागाच्या भरात चंद्रपूर येथील राहते घर सोडून मुंबईत आली असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तत्काळ चंद्रपूर येथील पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा हरविल्याची तक्रार चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर सुजाताच्या आईशी संपर्क साधून सीएसएमटीला बोलाविले. त्यानंतर सुजाताला आईसोबत चंद्रपूर येथे पाठवण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत एका पोलिसाला पाठविण्यात आले. शनिवारी सुजाता आणि तिची आई चंद्रपूर येथे पोहचल्याचे पोलिसांनी सांगितले.
>मुंबईच्या ओढीमुळे अल्पवयीन मुलांचे पलायन
मुंबईच्या ओढीने किंवा पालकांशी वाद घालून अल्पवयीन मुले मुंबईत येतात. मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांकडून अशा मुलांना हेरले जाते. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी करून पालकांकडे सुपूर्द केले जाते, असे सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी सांगितले.

Web Title: Police took the girl from Chandrapur and handed over to the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.