खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ स्टीकर्स

By Admin | Updated: January 30, 2015 23:28 IST2015-01-30T23:28:36+5:302015-01-30T23:28:36+5:30

बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस असे स्टीकर्स लावलेल्या ३३ खाजगी दुचाकींवर वाहतूक विभागाने कारवाई केल्याने

'Police' Stickers on Private Vehicles | खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ स्टीकर्स

खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ स्टीकर्स

शहाड : बुधवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस असे स्टीकर्स लावलेल्या ३३ खाजगी दुचाकींवर वाहतूक विभागाने कारवाई केल्याने पुन्हा एकदा ‘पोलीस’ स्टीकर्स लावलेल्या खाजगी वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ‘पोलीस’ असे स्टीकर्स आपल्या खाजगी वाहनांवर चिकटविता येणार नाही, असा राज्याच्या वाहतूक विभागाचा आदेश पोलिसांनीच धाब्यावर बसविल्याचे दिसते.
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या खाजगी दुचाकी व वाहनांवर ‘पोलीस’ असे स्टीकर्स लावलेले दिसतात़ एवढेच नव्हे तर त्यांच्या परिवारातील सदस्यांकडे आणि काही सेवानिवृत्त पोलिसांकडे असलेल्या खाजगी वाहनांवरसुद्धा ‘पोलीस’ असे स्टीकर्स लावलेले दिसतात. त्यामुळे अशी वाहने कोणीही अडवत नाही किंवा चालकाकडे कोणत्याही प्रकारची विचारपूस होत नाही.
नो-पार्किंगमधील दुजाभाव
नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास ती टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेली जातात आणि त्या वाहनमालकांना ३०० रुपये दंड केला जातो. मात्र, अशा क्षेत्रात पोलीस स्टीकर्स असलेले वाहन उभे असल्यास ते उचलून नेले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
खाजगी वाहनांवर लाल दिवा
कल्याण, उल्हासनगरमधील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे लाल दिवा असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. टोलनाका येण्याआधी आपल्या चारचाकी वाहनावर लाल दिवा लावला जातो. पुढे टोलनाका गेल्यानंतर काढून गाडीत ठेवला जातो.

Web Title: 'Police' Stickers on Private Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.