कर्तव्य बजावतांनाच पोलीस श्वान कॅटरीना ‘शहीद’
By Admin | Updated: October 22, 2014 00:02 IST2014-10-22T00:02:47+5:302014-10-22T00:02:47+5:30
तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कर्तव्य बजावतांना पोलिसांचा श्वान ‘शहीद’ होण्याची ठाणे जिल्हयातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कर्तव्य बजावतांनाच पोलीस श्वान कॅटरीना ‘शहीद’
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे : भिवंडी तालुक्यातील मोहिली येथील दरीतून रविवारी बेपत्ता झालेल्या नारायण गिरीधर चौधरी (६३) यांच्या मृतदेहाचा शोध घेत असतांनाच ठाणे ग्रामीण पोलिस श्वान पथकातील कॅटरीना या श्वानाचा मृत्यू ओढावण्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कर्तव्य बजावतांना पोलिसांचा श्वान ‘शहीद’ होण्याची ठाणे जिल्हयातील ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मोहिली गावातील जुगाडगाव किल्याजवळील उंबराचे पाणी या ठिकाणच्या डोंगरावर चौधरी हे १८ आॅक्टोंबर २०१४ रोजी गिर्यारोहणासाठी गेले होते. ट्रॅकिंग करतांना त्यांचा पाय सटकला आणि ते याठिकाणच्या दरीत कोसळले. रविवारी सकाळी ९ वा. चौधरी यांचा त्यांच्या मुलाला फोन आला. त्यानंतर त्यांचा फोन न लागल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, गणेशपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. के. मातोंडकर, हवालदार नांगरे यांच्यासह गिर्यारोहकांचा चमू आणि ग्रामस्थांच्या २०-२० जणांच्या गटाच्या मदतीने त्यांचा शोध सुरु होता. तरीही शोध न लागल्याने मंगळवारी सकाळी ठाणे ग्रामीण पोलिस श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान कॅटरिना हिच्यासह उपनिरीक्षक चंद्रकांत बनकर, डॉग हॅन्डलर दुश्यंत कांबळे यांचे पथक सकाळी १०.३० वा. घटनास्थळी पोहचले. चौधरी यांचा बुट, सॅन्डल आणि काही वस्तुंचा कॅटरीनाला वास देण्यात आल्यानंतर तब्बल चार ते पाच किमी चे अंतर तिने अत्यंत चपळतेने कापले. ज्या ठिकाणी ती थांबली. तिथून जवळच काही अंतरावर चौधरी यांच्या मृतदेहाचा शोध गिर्यारोहकांना १.३० वा. च्या सुमारास लागला. कडक ऊन डोंगर चढतांना लागलेली धाप हे सर्व एकत्र आल्याने तिला चक्कर आली होती.