Join us  

फटाकेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:52 AM

आज दिवाळीची पहिली आंघोळ. आजपासून दिवाळी खऱ्या अर्थी सुरू होते, असे म्हटले जाते. भल्या पहाटेपासूनच फटाके वाजवले जातात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे.

मुंबई : आज दिवाळीची पहिली आंघोळ. आजपासून दिवाळी खऱ्या अर्थी सुरू होते, असे म्हटले जाते. भल्या पहाटेपासूनच फटाके वाजवले जातात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत गस्त वाढविली आहे. गस्तीदरम्यान कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येणार आहे.मुंबई पोलीस प्रवक्ते, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत पाठविण्यात आली आहे. तसेच त्याबाबत ठोस पावले उचलण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाणे, परिमंडळ अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंगे यांनी सांगितले. नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.सोसायटी, चाळी, महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडून या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. भांडुप, घाटकोपर, कुर्ला, देवनार, गोवंडी, शिवाजीनगर, गिरगाव चौपाटी, मरिन ड्राइव्ह, गेट वे, वरळी सी फेस, नरिमन पॉइंट, शिवाजी पार्क अशा ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.... तर दंडासह आठ दिवसांचा तुरुंगवाससाध्या गणवेशातील पोलिसांचा तसेच ५ हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून पोलिसांचा सर्वत्र वॉच असेल. फटाके फोडण्याच्या वेळेचे उल्लंघन झाल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षास तक्रार प्राप्त होताच, त्याबाबत संबंधित पोलिसांकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल. फटाके फोडत असल्यास ध्वनिप्रदूषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांना ८ दिवसांचा तुरुंगवास आणि दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :फटाकेदिवाळी