वानखेडे स्टेडियमला पोलिसांचे सुरक्षाकवच

By Admin | Updated: October 29, 2014 01:40 IST2014-10-29T01:40:54+5:302014-10-29T01:40:54+5:30

वानखेडे स्टेडियममध्ये होणा:या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी शासनाने जोरदार तयारी करीत असतानाच पोलिसांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे.

Police protection guard at Wankhede stadium | वानखेडे स्टेडियमला पोलिसांचे सुरक्षाकवच

वानखेडे स्टेडियमला पोलिसांचे सुरक्षाकवच

डिप्पी वंकाणी - मुंबई
शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियममध्ये होणा:या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी शासनाने जोरदार तयारी करीत असतानाच पोलिसांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. त्यासाठी स्टेडियमभोवती तब्बल दोन हजारांहूनही अधिक पोलिसांचे कडे उभारण्यात येणार आहे. 
सर्वात मोठा राजकीय समारंभ समजल्या जाणा:या या शपथविधी सोहळ्यास सुमारे 25 हजार महत्त्वाच्या व्यक्ती आणि पाच हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेच्या अंतिम टप्प्याची तयारी आता सुरू असून, आम्ही भाजपा सदस्यांबरोबर तिची पाहणी केली आहे, असे दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेडियमवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे, तर महत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था स्टेडियमच्या प्रेक्षागृहात करण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे म्हटले. दरम्यान सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्याला मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमीर खान आदींची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर अतिरिक्त जबाबदारी पडू शकते. स्टेडियममध्ये पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था प्रथम स्तरावर विशेष सुरक्षा पथकाकडून राखली जाणार आहे. दुस:या स्तरात पोलीस आणि तिस:या स्तरात खाजगी सुरक्षा अधिकारी असतील, असेही सूत्रंनी स्पष्ट केले. आमंत्रितांसाठी तीन वेगवेगळ्या रांगांमध्ये आसनव्यवस्था करण्यात आली असून पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल मधल्या रांगेत बसतील. याचबरोबर वाहनतळ स्टेडिअमपासून 2क्क् मीटर दूर, आत प्रवेश करणा:यांची अंगझडती, मेटल डिटेक्टर्स, आत बॅगा नेण्यास मज्जाव इत्यादी सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वसाधारण उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. सुमारे दोन तास चालणारा हा शपथविधी सोहळा सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे. या वेळेत स्टेडियमकडे जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत.  
 

 

Web Title: Police protection guard at Wankhede stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.