पोलिसांचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 05:29 IST2017-08-16T05:29:32+5:302017-08-16T05:29:32+5:30

स्वातंत्र्यदिन आणि दहिहंडी उत्सवाला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप आले होते. रात्री उशिरापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Police protection armor | पोलिसांचे सुरक्षा कवच

पोलिसांचे सुरक्षा कवच


मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि दहिहंडी उत्सवाला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप आले होते. रात्री उशिरापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
यंदा आयोजकांनी माघार घेतल्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झालेला पहावयास मिळाला. अनेक ठिकाणी गोविंदा विनाहेल्मेट, ट्रिपल सीट जाताना दिसले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक चौकात, प्रमुख मार्गावर वाहतूक पोलिसांबरोबर स्थानिक पोलीस वाहतूकीचे नियोजन करत होते. दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यासोबतच घातलेल्या अटी व नियमांचे पालन होते का? यावर पोलिसांची बारकाईने नजर होती.

Web Title: Police protection armor