Join us

संजय मोरेच्या जामिनाला पोलिसांनी केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:23 IST

संजय मोरे याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी संजय मोरे याच्या जामीन अर्जावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. ज्या बसने अपघात झाला, त्या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असे आरटीओच्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी सत्र न्यायालयाला दिली. 

संजय मोरे याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात येत आहे, असा बचाव माेरेच्या वकिलांनी केला.

-  मोरे याच्या जामीन अर्जावर पोलिसांनी आक्षेप घेतला. बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे आरटीओ अहवालात म्हटले आहे. तसेच मोरेने सेवेत असताना मद्यप्राशन केले नव्हते, असे एफएसएलच्या अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत ४० साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. मोरेची जामिनावर सुटका केल्यास तो फरार होऊ शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :मुंबई पोलीसन्यायालय