पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:11+5:302014-10-04T22:55:11+5:30
पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की

पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की
प लीस कर्मचार्याला धक्काबुक्कीमुंबई: नो एन्ट्रीमध्ये रिक्षा घुसवल्याने रिक्षा चालकाला दंड ठोठावणार्या वाहतूक पोलीस कर्मचार्यालाच धक्काबुक्की करण्यात आली. शुक्रवारी दुपारी ही घटना अंधेरीच्या मोटा नगर येथे घडली असून पोलिसांनी यामध्ये उदय नायक (५१) या इसमाला अटक केली आहे. विमानतळ वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले सुभाष देशमुख हे नेहमी प्रमाणे ए.के. रोड परिसरात कर्तव्य बजावत होते. याच दरम्यान रिक्षा चालक विरुद्ध दिशेने रिक्षा घेऊन आला. देशमुख यांनी रिक्षा चालकास रोखले असता, प्रवाशाने देशमुख यांना धक्काबुक्की केली. त्यानुसार त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)