Join us  

पोलीस कर्मचाऱ्यानेच केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न! महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या आवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 3:56 AM

महिला अत्याचार प्रतिबंधक कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या गाडीतच पोलिसाने पत्नीचा गळा आवळला. तिला शांत करण्यासाठी सामानाने भरलेली गोणी डोक्यात घातली. त्याच दरम्यान एकाने गाडी ठोठावताच, त्याने पत्नीला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले.

- मनीषा म्हात्रेमुंबई : महिला अत्याचार प्रतिबंधक कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या गाडीतच पोलिसाने पत्नीचा गळा आवळला. तिला शांत करण्यासाठी सामानाने भरलेली गोणी डोक्यात घातली. त्याच दरम्यान एकाने गाडी ठोठावताच, त्याने पत्नीला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. हत्येचा प्रयत्न फसल्यानंतर तिला विद्रुप केले. आणि तब्बल ६ तासाने तिला बेशुद्धावस्थेत पोलीस मामाच्या घराबाहेर सोडून तो पसार झाल्याची धक्कादायक भायखळामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी प्रशांत छगन नांगरे (३१) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.ताडदेव पोलीस वसाहतीत ३० वर्षाची नेहा (नावात बदल) आई वडील आणि ३ वर्षाच्या मुलासोबत राहते. १९ मे २०१३ रोजी तिचा प्रशांतसोबत विवाह झाला. प्रशांत वरळी एलए विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर नेहा त्याच्यासोबत घाटकोपर परीसरात राहण्यास होती. लग्नाच्या तीन महिन्यानंतर प्रशांतच्या अनैतिक प्रेमसंबधाविषयी तिला समजले. दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर प्रशांत बदलेन असे नेहाला वाटले. मात्र प्रशांतने घरी पैसे देणे बंद केले. त्यामुळे सासू सासरे नेहाचा छळ करु लागले. याच रागात त्यांनी नेहाला घराबाहेर काढले. ती मुलाला घेऊन माहेरी आली. नातेवाईकांच्या मदतीने दोघांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र काहीही साध्य झाले नाही. त्यात आॅगस्ट २०१६ मध्ये प्रशांतने वांद्रे येथील कौटूंबिक न्यायालयात घटस्फोट आणि मुलाचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला. पुढे प्रशांत न्यायालयात हजर राहत असल्याने त्यांचे हे प्रकरण प्रलंबित राहिले. त्यानंतर नेहाने गिरगाव न्यायालयात पोडगीसाठी दावा केला. हेही प्रकरण प्रलंबित आहे. याच दरम्यान नेहाने प्रशांतसोबत बोलणे सोडले.२० मार्च रोजी मुलाच्या शाळेच्या प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशांतने तिला भेटण्यास बोलावले. ठरल्याप्रमाणे २१ मार्च रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास नेहाने भायखळा येथील महिला अत्याचार प्रतिबंधक करार्यालय गाठले. सव्वा आठच्या सुमारास प्रशांत तेथे आला. कार्यालयाच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केलेल्या गाडीमध्ये बसून बोलूया असे सांगून दोघे गाडीत बसले. दोघांमध्ये चर्चा सुरु झाली. १० च्या सुमारास प्रशांतने मित्राला घेऊन येतो असे सांगत डिकीतून गोणी घेऊन आला. नेहाला काही समजण्याच्या आतच त्याने तिच्या नाका, तोंडावर रुमाल धरला. आणि दुसºया हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. ती मदतीसाठी काचेवर हात मारत होती. तिला शांत करण्यासाठी जवळील गोणी तिच्या डोक्यात घातली. ह्णतुला अद्दल घडवायची आहेह्ण.. असे म्हणत त्याने तिचा गळा आणखीन आवळला. त्याच दरम्यान एकाने काचेवर नॉक केले. प्रशांतने तिला पाणी दिले. ते पिताच ती बेशुद्ध झाली. आणि प्रशांत तिला घेउन तेथून निघून गेला.सायंकाळी ४ च्या सुमारास प्रशांत हा गाडी घेवुन ताडदेव याठिकाणी आला. त्याने नेहाला ताडदेव पोलीस ठाण्याच्या इमारतीत राहत असलेल्या मामांच्या सोडले. आणि बेल वाजून तो निघाला. दारात बेशुद्धावस्थेत पडलेल्या भाचीला बघून त्यांना धक्का बसला.प्रयत्न फसल्यानंतर केले विद्रुपमामांनी नेहाच्या कुटुंबियांना बोलावून घेतले. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरु केले. रात्री ८ च्या सुमारास ती शुध्दिवर आली. तेव्हा तिने चेह-यावर काळे डाग उठलेले पाहिले. ती बेशुद्धावस्थेत असताना, प्रशांतने तिला विद्रुप केल्याचा संशय नेहाला आहे. तिने याबाबत प्रशांतला विचारले मात्र त्याने तिचा फोन घेतला नसल्याचे तिने तक्रारीत म्हंटले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.अद्याप अटक नाहीरात्री उशिराने नेहाने कुटुंबियांसोबत भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रशांतविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांत अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली.

टॅग्स :पोलिसमुंबईगुन्हा