पॅरोलवर फरार झालेला सराईत गुन्हेगार गजाआड

By Admin | Updated: October 11, 2014 03:38 IST2014-10-11T03:38:59+5:302014-10-11T03:38:59+5:30

हत्येच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येवून पसार

Police offender escaped from parole | पॅरोलवर फरार झालेला सराईत गुन्हेगार गजाआड

पॅरोलवर फरार झालेला सराईत गुन्हेगार गजाआड

मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर येवून पसार सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा कक्ष ७ च्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. सचिन गजानन शेट्ट्ये (३७) असे आरोपीचे नाव असून २००८ मध्ये मुलुंड येथील टायटन शोरुमवर अंधाधुंद गोळीबार केल्यासह त्याच्या विरोधात हत्या, खंडणी आणि बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी तब्बल सात गुन्हे दाखल आहेत.
मीरारोड येथील पार्श्वनगरमध्ये राहणाऱ्या शेट्ट्ये याला २००० मध्ये बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हत्येच्या गुन्हयात आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती. कारागृहात राहून स्वत:ची टोळी आॅपरेट करत असलेला शेट्ट्ये हा नाशिक कारागहातून आॅगस्ट महिन्यात पॅरालवर बाहेर पडला. गुन्हेगारी जगात पुन्हा सक्रिय होण्याच्या इराद्याने पॅरोलवर बाहेर आलेल्या शेट्ट्ये पुन्हा कारागृहात न परतल्याने पोलीस यंत्रणांनी त्याचा शोध सुरु केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Police offender escaped from parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.