पोलिसाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून लूट

By Admin | Updated: January 1, 2017 03:21 IST2017-01-01T03:21:20+5:302017-01-01T03:21:20+5:30

पोलीस शिपायाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून, लुटारू पोलीस पत्नीनेच घरातील चार लाख किमतीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना ताडदेव परिसरात घडली.

The police looted the policeman in the bathroom | पोलिसाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून लूट

पोलिसाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून लूट

मुंबई : पोलीस शिपायाच्या पत्नीला बाथरूममध्ये डांबून, लुटारू पोलीस पत्नीनेच घरातील चार लाख किमतीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना ताडदेव परिसरात घडली. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी पोलीस पत्नी प्रियांका उत्तेकर यांना अटक केली आहे.
ताडदेव पोलीस वसाहतीत श्वेता नार्वेकर कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचे पती पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समोरच्या इमारतीत उत्तेकर कुटुंबीय राहतात. त्यांचे पती मलबार हील पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी श्वेता घरात एकट्याच होत्या. त्याच वेळी चेहऱ्यावर स्कार्प बांधून प्रियांका त्यांच्या घरात घुसली. श्वेता यांना बाथरूममध्ये डांबून, त्यांच्या कपाटातून ४ लाख किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला आणि प्रियांका तेथून पसार झाली. दुपारी घरी परतलेल्या नार्वेकरांना पत्नीने डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यांना सर्व प्रकार समजताच, त्यांनी ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. नार्वेकरांनी केलेल्या वर्णनावरून ती महिला प्रियांका असल्याचा संशय पोलिसांना आला. कारण यापूर्वीही प्रियांकाच्या हातचलाखीचे किस्से चर्चेत होते. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला, तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियांकाच्या प्रतापाबाबत तिचे पतीही अनभिज्ञ होती. तिच्या अटकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The police looted the policeman in the bathroom