विक्रोळीत कारच्या धडकेत पोलिस ठार
By Admin | Updated: September 1, 2014 11:28 IST2014-09-01T11:28:07+5:302014-09-01T11:28:42+5:30
विक्रोळीजवळील हायवेवर एका भरधाव वेगाने येणा-या कारशी धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिसाचा मृत्यू झाला आहे

विक्रोळीत कारच्या धडकेत पोलिस ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - विक्रोळीजवळील हायवेवर एका भरधाव वेगाने येणा-या कारशी धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सब इन्स्पेक्टर देसाई (वय ५३) असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव असून याप्रकरणी कारचालक मितेश मोदी याला अटक करण्यात आली आहे. काल मध्यरात्री हा अपघात झाला होता.
'ड्रंक अँड ड्राईव्ह' मोहिमेवरून सहका-यासह परतणा-या देसाई यांच्या बाईकला विक्रोळीजवळ एका भरधाव वेगाने येणा-या मारूती कारन धडक दिली. यात देसाई जबर जखमी झाले, त्यांना उपचारासांठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.