पोलीस जीपला महामार्गावर अपघात

By Admin | Updated: December 20, 2014 22:10 IST2014-12-20T22:10:20+5:302014-12-20T22:10:20+5:30

मुंबई - गोवा महामार्गावर पांडापुर गावाच्या परिसरात पोलीस जिपला ट्रकने धडक दिली. या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले.

Police Jeep accident on highway | पोलीस जीपला महामार्गावर अपघात

पोलीस जीपला महामार्गावर अपघात

वडखळ : मुंबई - गोवा महामार्गावर पांडापुर गावाच्या परिसरात पोलीस जिपला ट्रकने धडक दिली. या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले.
मुंबई- गोवा महामार्गावरु न नागोठणे बाजुकडुन वडखळकडे येणारी पोलीस जिप ही पांडापूर गावात आली असता नागोठणे बाजुकडुन वडखळकडे जाणारा ट्रकहा अचानकपणे उजविकडे वळल्याने जिपला धडक बसली. यात जिप रस्त्यावर उलटी झाली. या अपघातात पोलीस जीपमधील चालक किसन खंडागळे, पोलीस निरिक्षक एन. व्ही. उगळे, पोलीस हवालदार कीशोर पाटील, तुलशिराम भिंगारे, अशितोष म्हात्रे, विष्णु म्हात्रे, नवोदिता धनावडे हे जखमी झाले. अपघातातील जखमींना गडब येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रकचालक राजेंद्र दाभाडे राहणार नागोठणे याला वडखळ पोलिसांनी अटक केलि असुन अधिक तपास वडखळ पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

च्तळोजा - सायन-पनवेल मार्गावर सकाळी १०च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला बेलापूर येथे अपघात झाला, यामध्ये जिवीत हानी झालेली नसली तरी गाडीतील मालाचे नुकसान झाले
च्बेलापूर मार्गावर तासभर वाहतुक कोंडी झाली. बेलापूर उड्डाण पुलाच्या संरक्षण कठडयाचा मोकळया असलेल्या भागावर भरधाव वेगाने ट्रक आल्याने हा अपघात झाला.

Web Title: Police Jeep accident on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.