Join us  

पोलिसांमुळे टळली मोठी दुर्घटना, वरिष्ठ निरीक्षकाने जखमी मुलींना पोहोचवले रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:08 AM

चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली.

मुंबई : चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यात, शंभरावे वर्ष असल्याने दुपारपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविक तेथे धडकले. धक्काबुकी वाढली. यात, भुरळ येवून पडलेल्या चार मुलींना काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बसवत यांनी स्वत: उचलून त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली.जवळपास अडीचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. गर्दीतील रोडरोमियो, पाकिटमार, टवाळखोरांमध्ये, फोटोसाठी धडपडणाऱ्यांमुळे धक्काबुकी झाली. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाºयाने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला.चेंगराचेंगरी थांबविण्यास पोलिसांना यश आले. यात झालेल्या धक्काबुकीत काही जण किरकोळ जखमी झाले. मोठी दुर्घटनाटळली.याच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलींकडे बसवत यांचे लक्ष गेले. त्यांनी स्वत: मुलींना उचलून त्यांची रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारे चार मुलींना त्यांनी रुग्णालयात सुखरुप पोहचवले. तर, गर्दीत ५३ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत़ याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :पोलिस