सात महिन्यांनी पोलीस झाले रिलॅक्स!
By Admin | Updated: October 28, 2014 23:09 IST2014-10-28T23:09:10+5:302014-10-28T23:09:10+5:30
बकरी ईद पुन्हा विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सण अशा एकामागोमाग आलेल्या बंदोबस्ताचा सात महिन्याचा ताण आता काहिसा संपल्यामुळे पोलीस रिलॅक्स झाले आहेत.

सात महिन्यांनी पोलीस झाले रिलॅक्स!
जितेंद्र कालेकर - ठाणो
लोकसभा निवडणूकीनंतर गणोशोत्सव त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव , बकरी ईद पुन्हा विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सण अशा एकामागोमाग आलेल्या बंदोबस्ताचा सात महिन्याचा ताण आता काहिसा संपल्यामुळे पोलीस रिलॅक्स झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून न मिळणा:या रजा आणि रद्द झालेले ऑफ आता त्यांना मिळू लागले आहेत.
एप्रिल आणि मे 2क्14 च्या दरम्यान लोकसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणूका होताच अनेकांच्या वार्षिक बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक अधिकारी जिल्हा बदलून ठाण्यात आले. त्यातच जिल्हा विभाजन झाल्यामुळे पालघर आणि ठाण्यातूनही अनेकांच्या बदल्या झाल्या.
नविन जिल्हयाची ओळख होईपर्यन्त ऑगस्ट मध्ये गणोशोत्सवाचा बंदोबस्त लावण्यात आला. हा बंदोबस्त सतत 24 ते 48 तास कधी कधी यापेक्षाही अधिक कालावधीचा होता. त्यामुळे अनेकांना घरच्या गणोशाचेही दर्शन झाले नाही. गणोश विसर्जनानंतर 15 सप्टेंबरला लगेच विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे या काळात बेकायदा शस्त्र जमा करणो, प्रतिबंधात्मक कारवाई करणो, आचारसंहितेचे पालन न करणा:यांविरुद्ध करडी नजर ठेवून गुन्हे नोंदविणो, राजकीय सभांचे बंदोबस्त, विविध प्रकारच्या रॅली, प्रचार आणि शेवटी निवडणूक आणि मतमोजणीचा बंदोबस्त 19 ऑक्टोंबरपर्यन्त सुरु होता. त्यातही विविध राजकीय पक्षांचे वाद, स्पर्धा आणि वैमनस्य हाताळतांना पोलिसांची कसोटी लागली.
त्याच दरम्यान 25 सप्टेंबरला घटस्थापना अर्थात नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त सुरु झाला. तो दसरा अर्थात 3 ऑक्टाेंबरपर्यन्त लावण्यात आला होता. त्यापाठोपाठ बकरी ईद. नंतर 21 ते 25 ऑक्टोंबर दरम्यान दिवाळी सणाचा बंदोबस्त होता. त्यामुळे या सर्वच काळात पोलिसांच्या सुटया व विकली ऑफ बंद करण्यात आले होते. आत ते सुरू झाले आहेत.
मंगळसूत्र चोरी पासून अनेक गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता 26 ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर या काळात मोहरमचाही बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात सुटया देणो सुरु झाले तरी मुळातच पोलीस व अधिकारी कमी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण मात्र कायम आहे. अशी माहिती एका वरीष्ठ पोलिस अधिका:याने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे अनेक कर्मचा:यांची प्रकृतीतही बिघाड झाल्याचेही या अधिका:याने सांगितले.
निवडणूक काळात गृहरक्षक दल आणि राज्य राखीव दलासह केंद्रीय पोलिस दलाचीही मदत घेण्यात आली होती. तरीही अपु:या संख्याबळातही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, अशी माहिती सूत्रंनी दिली.