आरेमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:28 IST2018-05-09T15:28:59+5:302018-05-09T15:28:59+5:30
आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी शिंदे यांच्या मुलाचा मृतदेह आरे परिसरात मंगळवारी सापडला.

आरेमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह सापडला
मुंबई: आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी शिंदे यांच्या मुलाचा मृतदेह आरे परिसरात मंगळवारी सापडला. अथर्व (२०) असे त्याचे नाव आहे. स्थानिकांनी याची माहिती आरे पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व रविवारी पार्टीला गेला होता, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मानेवर काही खुणा आहेत तसेच तोंडातून रक्त येत होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ शव विच्छेदन अहवालानंतरच उघड होईल, असे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. तो आरेच्या रॉयल पाम परीसरात कुटुंबासोबत राहत होता. या प्रकारामुळे त्याच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.