पोलीस शिपायांना मुलुंडमध्ये मारहाण
By Admin | Updated: November 9, 2014 01:45 IST2014-11-09T01:45:10+5:302014-11-09T01:45:10+5:30
दारूच्या नशेत बारमध्ये राडा करणा:या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री मुलुंडमध्ये घडली.

पोलीस शिपायांना मुलुंडमध्ये मारहाण
मुंबई : दारूच्या नशेत बारमध्ये राडा करणा:या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री मुलुंडमध्ये घडली. या मारहाणीत मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणा:या चौघांना गजाआड केले. यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून, सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते.
युसूफ मलिक (3क्), गौतम इंगळे (32), कमलेश उपाध्याय (28) आणि बल्ली ठाकूर (3क्) अशी पोलीस शिपायांना मारहाण करणा:यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण, खासगी मालमत्तेचे नुकसान या कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. यापैकी मलिक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून, पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
काल रात्री मुलुंडच्या एलबीएस मार्गावरील साकी बारमध्ये हा प्रकार घडला. मलिक आपल्या साथीदारांसह साकी बारमध्ये दारू पीत होता. बिल देण्यावरून त्याने बारमध्ये राडा केला. त्याने व त्याच्या साथीदारांनी बारमधील वेटरना मारहाण सुरू केली. ही माहिती बारमधूनच पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार मुलुंड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील शिपाई सुनील दत्तात्रय कुडाळकर (3क्) आणि उत्तम महाडिक (28) रात्री 1क्च्या सुमारास बारमध्ये धडकले. या वेळी मलिक व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच हात उचलला. हा प्रकार समजताच मुलुंड पोलिसांनी जास्तीची कुमक पाठवून त्यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)