शिवसन्मान परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली
By Admin | Updated: August 30, 2015 02:25 IST2015-08-30T02:25:07+5:302015-08-30T02:25:07+5:30
इतिहासाचे पुन:र्लेखन करण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेला पोलिसांनी आयत्यावेळी परवानगी नाकारली आहे. त्याविरोधात सर्वच थरातून निषेधाचा सूर

शिवसन्मान परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली
ठाणे : इतिहासाचे पुन:र्लेखन करण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेला पोलिसांनी आयत्यावेळी परवानगी नाकारली आहे. त्याविरोधात सर्वच थरातून निषेधाचा सूर आळवला जात आहे. पुरोगामी चळवळीतील अनेकांनी हा लोकशाहीचा खून असल्याच्या प्रतिक्रि या दिल्या.
ठाण्यात शिवसन्मान जागर परिषदेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे, खा. भालचंद्र मुणगेकर, श्रीमंत कोकाटे, जितेंद्र आव्हाड, ज्ञानेश महाराव, प्रतिमा परदेशी आदी सहभागी होणार होते. सुरु वातीला या परिषदेला परवानगी देण्यात आली होती. मात्र, शनिवारी सायंकाळी अचानक ही परवानगी नाकारण्यात आली. या परिषदेला विविध संघटनांचा विरोध होता. त्यामुळे परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतिहास पुनर्लेखनासंबंधी आयोजित केलेल्या सभेला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारणे ही राज्यघटनेने लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली असून त्या विरोधात सविनय कायदेभंगाचे हत्यार उपसण्याची गरज आहे. - पी. बी. सावंत, निवृत्त न्यायमूर्ती