दहिसरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की
By Admin | Updated: March 31, 2017 06:58 IST2017-03-31T06:58:36+5:302017-03-31T06:58:36+5:30
वाढदिवस साजरा करण्यासाठी विजेची चोरी तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा

दहिसरमध्ये पोलिसांना धक्काबुक्की
मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी विजेची चोरी तसेच ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी दहिसरमध्ये घडला. मुख्य म्हणजे या प्रकरणात संबंधितांना अटकाव करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली असून, त्यानुसार तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.
दहिसर पूर्वेकडील अंबावाडी परिसरात डी.एन. दुबे रोडच्या मशिदीजवळ हा प्रकार घडला. सेलोट नामक इसमासह एकूण तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सेलोटच्या वाढदिवसासाठी आकडा टाकून घटनास्थळी रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. तसेच फटाकेही फोडले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तेथी धाव घेतली़ (प्रतिनिधी)