सिसलीयाच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: December 19, 2015 02:08 IST2015-12-19T02:08:18+5:302015-12-19T02:08:18+5:30
अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागात पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या सिसलीया डिसोजा या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

सिसलीयाच्या पोलीस कोठडीत वाढ
मुंबई : अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागात पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या सिसलीया डिसोजा या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बांगुरनगर पोलिसांनी तिला अटक केली होती.
सिसलीयाचा मुलगा रोनाल्ड डिसोजा (३१) याची हत्या तिचा प्रियकर भरत वोली (२५) आणि त्याचा साथीदार दीपक यांच्या मदतीने तिने केली. त्यानुसार सिसलीयाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांनी हत्याकांडातील आरोपी भरत आणि दीपक हे अद्याप सापडले नसल्याने तिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली.
त्यानुसार सिसलीयाची पोलीस कोठडी २२ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती बांगुरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली. (प्रतिनिधी)