विनयभंग करणाऱ्यांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: April 2, 2017 00:07 IST2017-04-02T00:07:30+5:302017-04-02T00:07:30+5:30
कुरारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी, तीन मुलांना अटक करण्यात आली होती. या तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विनयभंग करणाऱ्यांना पोलीस कोठडी
मुंबई : कुरारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी, तीन मुलांना अटक करण्यात आली होती. या तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मालाड पूर्वच्या पिंपरी पाड्यात एका गोदामात दोन अल्पवयीन मुलीना कोंडून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी गुरुवारी केला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी मनीष मिस्त्री, महेंद्र कोटेकर आणि क्लिफर्ड परेरा नामक तिघांना अटक करण्यात आले होते. त्यांना स्थानिक न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या मुलींचे अपहरण करण्यात आले होते, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत, अशी माहिती परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. या तिघांवर पॉस्को आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)