नववर्षाच्या निमित्ताने पोलिसांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:06 IST2021-01-02T04:06:32+5:302021-01-02T04:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी सुरू आहे. तर दुसरीकडे दरवर्षी ड्रंक ॲण्ड ...

नववर्षाच्या निमित्ताने पोलिसांची नाकाबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी सुरू आहे. तर दुसरीकडे दरवर्षी ड्रंक ॲण्ड ड्राइव्हमध्ये ब्रीथ ॲनालायझरने मद्यपान केले आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त तपासणी करून चालकाने मद्यपान सेवन केले की नाही याची तपासणी करण्यात येत आहे.
मुंबईतल्या प्रमुख ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करत, तपासणी सुरू आहे. मद्यपान केल्याचे आढळताच त्याच्यासह सोबत असलेल्या प्रवाशाविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले. ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी वाहतूक विभागाकडून ९४ टीम बनविण्यात आल्या आहेत. यात ३ हजार वाहतूक पोलिसांचा फाैजफाटा तैनात आहे.
महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी पोलिसांचे विशेष पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे.