अवजड वाहनांवर पोलिसांची बंदी
By Admin | Updated: August 26, 2014 01:11 IST2014-08-26T01:11:33+5:302014-08-26T01:11:33+5:30
कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण मानला जात असून या सणासाठी देशभरातून गणेशभक्त कोकणाकडे रवाना हात असतात. कोकणचा रस्ता हा एकपदरी होता.

अवजड वाहनांवर पोलिसांची बंदी
पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक शाखेमार्फत कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांनी दिली असून या वाहतूक व्यवस्थेमुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. याच
काळात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गिरधर यांनी दिली.
कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण मानला जात असून या सणासाठी देशभरातून गणेशभक्त कोकणाकडे रवाना हात असतात. कोकणचा रस्ता हा एकपदरी होता. परंतु कोकणी जनतेच्या पाठपुराव्यानंतर तो चौपदरीकरणाचे काम जरी सुरु झाले असले तरी ते काम पूर्ण न झाल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेतर्फे प्रवाशांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक शाखेतर्फे मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.
त्यामध्ये पाच बीचमार्गे किल्ला जंक्शन-गव्हाण फाटा-चिरनेरमार्गे खारपाडा पेण येथे जाता येऊ शकेल. तसेच एक्स्प्रेस हायवेने खालापूर टोलनाका मार्ग महाडकडे जाता येईल. एक्स्प्रेसमार्गे पुणे, सातारा, कराड, पाटण, कुंबवली मार्गे चिपळूणकडे रवाना होता येईल.
एक्स्प्रेसमार्गे पुणे, सातारा, कराडमार्गावरुन चिपळूण रत्नागिरीकडे जाता येईल. एक्स्प्रेसमार्गे पुणे, सातारा, कोल्हापूर, राधानगरी, फोंडामार्गे वैभववाडी कणकवलीकडे जाता येईल आणि एक्स्प्रेसमार्गे पुणे, सातारा, कराड या मार्गाने गगनबावडा कणकवलीकडे जाता येईल. एक्स्प्रेसमार्गे पुणे, सातारा, कोल्हापूर, अंबोली घाटमार्गे सावंतवाडीकडे जाता येईल.
गणेशभक्तांना मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक स्टेज उभारण्यात येणार असून ते कळंबोली सर्कल, पळस्पे चौक, सत्कार हॉटेल, खारपाडा ब्रीज येथे राहणार असून राहुट्या मॅकडोल हॉटेल, ओशियन गेट, गिरवले गाव, सांगुर्ली गाव, शिरढोण गाव, फॉरेस्ट चौकी येथे राहणार असून अत्यावश्यक सेवा म्हणून हायड्रा क्रेम-कळंबोली सर्कल, पळस्पे, सत्कार हॉटेल, खारपाडा ब्रीज, कर्नाळा अभयारण्य, फॉरेस्ट चौकी येथे राहणार असून डी डी क्रेन-पळस्पे, सत्कार हॉटेल येथे राहणार आहे.
तसेच गॅस कटर-पळस्पे,
खारपाडा ब्रीज येथे ठेवण्यात
येणार आहेत आणि रेस्क्यु व्हॅनमध्ये एमरजन्सी लाईट, जनरेटर, झाडे कापण्याचे साहित्य, मेगाफोन, प्रथमोपचार पेटी, रिपेरेक्टर ट्रॅगल आणि अॅम्ब्युलन्स-खारघर,
कळंबोली सर्कल, पनवेल, पळस्पे, खारपाडा येथे असणार आहेत. केमिकल एक्सर्ट-पळस्पे चौकी येथे राहणार आहे. या सर्वांचे नियंत्रण, कक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडळ-दोन वाहतूक शाखा यांच्या कार्यालयात राहील.