Join us

अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला विद्यार्थिनींनी दिले पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 02:27 IST

महाविद्यालय परिसरात मुलींना पाहून अश्लील चाळे करणा-या एका विकृताला विद्यार्थिनींनी चांगलाच धडा शिकवला.

मुंबई : महाविद्यालय परिसरात मुलींना पाहून अश्लील चाळे करणा-या एका विकृताला विद्यार्थिनींनी चांगलाच धडा शिकवला. महाविद्यालयातील सुरक्षारक्षक आणि प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थिनींनी त्याला पकडून माटुंगा पोलिसांच्या स्वाधीन केले. माटुंग्याच्या श्रीमती एम.एम.पी. शाह महिला महाविद्यालयात बुधवारी हा प्रकार घडला. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी त्या विकृताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर माहिती अशी, अंकुश अशोक महाडिक (वय - २७, रा. सायन, कोळीवाडा) नामक तरुण सकाळी महाविद्यालयात येणाºया विद्यार्थिनींना हेरत असे. बेसावध असणाºया मुलींना मिठ्या मारणे, अश्लील चाळे करणे असे प्रकार करून तो क्षणात तेथून पसार व्हायचा. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत प्राचार्य डॉ. लीना राजे आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळींनी महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. या प्रकाराला धाडसाने तोंड देण्याचे ठरवत विद्यार्थिनींनी त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अखेरीस १८ जुलैच्या सकाळी विद्यार्थिनींनी त्याला प्राध्यापक आणि सुरक्षारक्षक नवले यांच्या मदतीने पकडून माटुंगा पोलिसांच्या ताब्यात दिले.मात्र, मेट्रो शहरांत असे प्रकार घडत असतील, तर भारतातील महिला खरंच सुरक्षित आहेत काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :विनयभंग