विनयभंग प्रकरणी बडतर्फ पोलिसाला अटक
By Admin | Updated: May 11, 2015 04:20 IST2015-05-11T04:20:59+5:302015-05-11T04:20:59+5:30
पोलीस सेवेतून बडतर्फ केलेल्या वैभव केसकर (३८) या हवालदाराला विनयभंग केल्या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे.

विनयभंग प्रकरणी बडतर्फ पोलिसाला अटक
भार्इंदर : पोलीस सेवेतून बडतर्फ केलेल्या वैभव केसकर (३८) या हवालदाराला विनयभंग केल्या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस दलात नसतानादेखील आपण पोलीस असल्याचे सांगून तो भार्इंदर पश्चिमेच्या खाडीकिनारी राहणाऱ्या लोकांना त्रास देत असे.
केसकरच्या बाबतीत भार्इंदर पोलिसांच्या कानांवर तक्रारी येत होत्या. नुकतीच एका तीस वर्षीय महिलेने भार्इंदर पोलीस ठाण्यात येऊन त्याने विनयभंग केल्याची तक्रार केली होती. ठाणे अंमलदार मुक्ता क्षीरसागर यांनी महिलेच्या फिर्यादीची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी त्वरित कारवाई करून केसकरला अटक केली.