पोलिसाला मारहाण करणार्‍या मद्यपीला अटक

By Admin | Updated: May 7, 2014 21:50 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:50:41+5:30

बीट मार्शल जगदीश भालेराव यांनाच शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या सचिन थोरात (२६, रा. कामतघर) यास पोलिसांनी अटक केली आहे.

Police arrested the drunkard alcoholic | पोलिसाला मारहाण करणार्‍या मद्यपीला अटक

पोलिसाला मारहाण करणार्‍या मद्यपीला अटक

काल्हेर : दारूच्या नशेत सार्वजनिक रस्त्यावर येणार्‍या-जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करणार्‍या एका मद्यपीला समजावण्यास गेलेले बीट मार्शल जगदीश भालेराव यांनाच शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या सचिन थोरात (२६, रा. कामतघर) यास पोलिसांनी अटक केली आहे. तो दारूच्या नशेत कामतघर येथील बौद्ध विहाराजवळ लोकांना शिवीगाळ करीत होता. तेव्हा भालेराव यांनी त्यास समजवण्याचा प्रयत्न केला होता़

Web Title: Police arrested the drunkard alcoholic