पोलिसांना चकवा देणारी तरुणी अटकेत

By Admin | Updated: August 4, 2015 01:25 IST2015-08-04T01:25:23+5:302015-08-04T01:25:23+5:30

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोलिसांना चकवा दिला होता. मात्र पोलिसांनी

Police arrest suspect | पोलिसांना चकवा देणारी तरुणी अटकेत

पोलिसांना चकवा देणारी तरुणी अटकेत

मुंबई : मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोलिसांना चकवा दिला होता. मात्र पोलिसांनी या आरोपी तरुणीचा शोध घेऊन २४ तासांत तिला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
भार्इंदर येथे राहणारी संतोषी भोसले ही तरुणी गुरुवारी दादर रेल्वे स्थानकात उभी होती. काही वेळानंतर विरार लोकल रेल्वे स्थानकात आली. यावेळी ही तरुणी ट्रेनमध्ये चढत असतानाच उषा काळे या आरोपी तरुणीने संतोषीचा मोबाइल लंपास केला. तरुणीने तत्काळ आरडाओरडा केल्याने स्थानकावर असलेल्या पोलिसांनी मोबाइल चोरणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपी तरुणीला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. मात्र दुसऱ्या दिवशी या तरुणीने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता, ती उस्मानाबाद येथे तिच्या मूळ गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उस्मानाबाद येथे जाऊन तरुणीला अटक केली आहे.

Web Title: Police arrest suspect