अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
By Admin | Updated: November 29, 2014 22:25 IST2014-11-29T22:25:48+5:302014-11-29T22:25:48+5:30
तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रेतीची वाहतूक होत आहे. कर्जत चारफाटा येथे बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणा:या चार गाडय़ा पहाटे पकडल्या.

अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
कर्जत : तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रेतीची वाहतूक होत आहे. कर्जत चारफाटा येथे बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणा:या चार गाडय़ा पहाटे पकडल्या. या चारही गाडय़ा पकडून चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध वाहतूक करणा:या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
कर्जत पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार फाटा येथे शुक्रवारी नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी रेतीने भरलेल्या गाडय़ा आढळल्या. या गाडय़ा पोलिसांनी अडवल्या असता, या रेती वाहतूक करणा:या गाडय़ांकडे रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी तहसीलदारांना गाडय़ांविषयी माहिती देऊन त्यानुसार तहसीलदारांनी मंडळ अधिकारी सोपान बाचकर यांना गाडय़ांबाबतची माहिती देऊन तपास करण्याचे आदेश दिले.
कर्जत पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या चार डंपर चालकांकडे शासनाची स्वामित्वधन (रॉयल्टी) पावती नव्हती. या चालकांकडे अधिक चौकशी केली असता महाड कोकरी येथून ही रेती आणल्याचे चालकांनी सांगितले. त्यांच्याकडे रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याने मंडळ अधिकारी सोपान बाचकर यांनी या चारही डंपर चालकांच्या विरोधात कजर्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.
गाडय़ांचे चालक मुदिस्सर पोंजेकर, हुसेन नजे, सुफियान आढाळ आणि संतोष भुसारी या चारही गाडी चालकांवर कारवाई केली आहे. या चारही गाडय़ामध्ये साडेपंधरा ब्रास रेती आहे. यातील 1 लाख 28 हजार रु पये किमतीची रेती गाडय़ांसह पोलिसांनी जप्त केली आहे. रॉयल्टी न भरता रेती वाहतूक करण्यात येत होती. (वार्ताहर)