Join us  

वात्रटिकेचे चटके, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांचे घाव, मराठी भाषादिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात कवी संमेलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 9:25 PM

रसिकांनी मनसोक्त टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.   

श्रीकांत जाधव / मुंबई :शाब्दिक चटके देणाऱ्या चारोळी, वात्रटिका, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांनी मराठी भाषिकांच्या मनातील संताप व्यक्त करीत सध्याच्या राजकारणात खालावत असलेला स्तर, त्यामुळे समाजाची बदलती मानसिकता अशात गोंधळात सर्वसामान्य माणसाचे अनुत्तरित प्रश्न यावर नामवंत कवींनी घाव घातले. त्याला रसिकांनी मनसोक्त टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.   

जागतिक मराठी अकादमी आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने २७ फेब्रुवारी मराठी भाषादिनानिमित्त संघात कवी संमेलन आयोजित केले होते. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, साहेबराव ठाणगे यांनी आपल्या रसिकांच्या ह्र्दयस्पशी कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अरुण म्हात्रे यांच्या गाण कवितेने रसिकांची मने जिंकली तर प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा राजकीय वात्रटिकेने राज्यकर्त्यांना चांगलेच शाब्दिक चटके दिले. तेव्हा मनोमन सुखावलेल्या रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून सभागृह दणाणून सोडले. तसेच  महेश केळुसकर, साहेबराव ठाणगे, अशोक नायगावकर, नरेंद्र वाबळे यांनी ही कविता सादर रसिकांची मने जिंकली.

टॅग्स :मुंबईमराठी भाषा दिन