काव्यवाचन कार्यशाळा

By Admin | Updated: March 29, 2015 22:34 IST2015-03-29T22:34:02+5:302015-03-29T22:34:02+5:30

आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने ३ मे रोजी धारावीतील निसर्ग उद्यानात काव्यवाचन कार्यशाळा आयोजण्यात आली आहे. तिला गझलकार ए.के.शेख, गीतकार

Poetry workshop | काव्यवाचन कार्यशाळा

काव्यवाचन कार्यशाळा

ठाणे : आयकॉन फाऊंडेशनच्या वतीने ३ मे रोजी धारावीतील निसर्ग उद्यानात काव्यवाचन कार्यशाळा आयोजण्यात आली आहे. तिला गझलकार ए.के.शेख, गीतकार चंद्रशेखर सानेकर, प्रकाश होळकर, कवयीत्री मानसी देशमुख, कवी लक्ष्मण महाडीक, कवी शशिकांत तिरोडकर तसेच कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या काळात कवितेची निवड, सादरीकरणाची पद्धत, आवाजाचे तंत्रज्ञान, वाचनशैली, समष्टिची कविता आदी अनेक बाबींवर प्रात्यक्षिकासह निरुपण होणार
असून शिबिरार्थींसाठी काव्यलेखन स्पर्धाही आयोजिली आहे. इच्छुकांनी मनोज वरंदळ यांच्याशी ८८०५३५५५३५ संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Poetry workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.