पीएम यंग अचिव्हर्स शिष्यवृत्ती परीक्षा २९ सप्टेंबरला
By स्नेहा मोरे | Updated: August 20, 2023 20:18 IST2023-08-20T20:18:37+5:302023-08-20T20:18:45+5:30
विद्यार्थी या नियोजित तारखांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून अर्जामध्ये त्रुटी दुरुस्त करू शकतील, असे एनटीएकडून सांगण्यात आले.

पीएम यंग अचिव्हर्स शिष्यवृत्ती परीक्षा २९ सप्टेंबरला
मुंबई - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान यंग अचिव्हर्स शिष्यवृत्तीसाठी २९ सप्टेंबर रोजी परीक्षा आहे. विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा होती, त्यानंतर आता २२ ऑगस्टपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करता येईल.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही चूक झाली असल्यास ऑनलाइन माध्यमातून दुरुस्ती करू शकतील.
विद्यार्थी या नियोजित तारखांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करून अर्जामध्ये त्रुटी दुरुस्त करू शकतील, असे एनटीएकडून सांगण्यात आले. ओबीसी, ईबीसी, डीएनटी अशा प्रवर्गातील नववी व अकरावीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. २ लाख ५० हजारांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येणार नाही. पात्र विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपासून १ लाख २० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
परीक्षेचे स्वरुप
परीक्षा लेखी स्वरूपाची असून १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील.
परीक्षेसाठी अडीच तासांचा वेळ.
इंग्रजी, हिंदी परीक्षेचे माध्यम.
२९ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.