दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात आव्हाडांची सुप्रीम कोर्टात याचिका
By Admin | Updated: August 13, 2014 13:39 IST2014-08-13T13:24:40+5:302014-08-13T13:39:33+5:30
दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनो-याची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केली आहे.

दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात आव्हाडांची सुप्रीम कोर्टात याचिका
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १३ - दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनो-याची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केली आहे. आव्हाड यांच्या दहीहंडी मंडळाचे सदस्य असणारे अमित सारिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.
दहीहंडीचा सराव करताना खाली पडून गेल्या दोन दिवसांत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हा आदेश दिला होता. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाचा अनेक मंडळांकडून विरोध होत आहे. दहीहंडी सम्नवय समितीने न्यायालयाच्या निर्देशाला विरोध करत दहीहंडी 'थर'थराट सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेत या निर्णयाबाबत राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणीही केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण सर्वोच्च्ा न्यायालयात आव्हाण देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दहीहंडी उत्सव ही महाराष्ट्राची ओळख असून हा उत्सव जिवंत राहावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले होते.
दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी आयोजकांनी गोविंदा पथकांना सेफ्टी बेल्ट व हेल्मेट द्यावीत तसेच हंडी फोडण्यासाठी जेथे थर लावले जाणार असतील तेथे जाड गाद्या ठेवण्यात याव्यात, असेही न्यायालयाने आपल्या निर्देशात नमूद केले होते.